Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? दिल्लीत मोदींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा खासदारांची संख्या वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष मिशन राबवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निम्म्याहून अधिक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निम्मे खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांची दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीमध्ये ठाकरेंच्या खासदारांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले होते. पण आता यामधील अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या शिवेसनेच्या संपर्कात असल्याचे समजत आहे. हे खासदार लवकरच सत्तेत जाणार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे नुकतेच दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या महत्त्वाच्या भेटीमध्ये शिंदेंनी आपल्या संपर्कात असलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाचे जे खासदार संपर्कात आहेत, ते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच मोठा राजकीय बदल घडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:






