मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला उद्धव ठाकरे 16 जून रोजी भेट देणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही राहणार आहेत. सहा महिन्यांपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी राम मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा उचलत उद्धव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं.
Shiv Sena chief Uddhav Thackeray along with all 18 party MPs will visit Ayodhya on June 16. (File pic) pic.twitter.com/mc90r6Q2Qi
— ANI (@ANI) June 7, 2019
यापूर्वी, लोकसभा निवडणुक संपताच शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून ‘रामाचे काय होईल’ असा अग्रलेख लिहण्यात आला होता. शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात लिहिले आहे की, ‘काँग्रेस राज्यात राम अंधारात होते. अयोध्येत दिवाळी साजरी करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले होते?’’ असा कडक सवाल पंतप्रधान मोदी यांनी काशीला जाऊन विचारला. प्रश्न खरा आहे. अयोध्येत आता दिवाळीच होईल. रामाचे काम अयोध्येत आणि देशात सर्वत्र होईल. हाच जनादेश आहे.’ असेही या अग्रलेखात लिहिले आहे.