उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर; अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी

Uddhav Thackeray | मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकातील नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आज मराठवाडा दौऱ्यावर असणार आहे.
उद्धव ठाकरे लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. एकाच दिवसात उद्धव ठाकरे हे पाच जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.
कसे असणार दौऱ्याचे नियोजन ?
आज सकाळी 11 वाजता ते लातूर विमानतळावर दाखल होतील. तिथून ते लातूर तालुक्यातील काडगाव येथे सकाळी 11.30 वाजता पोहोचतील. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून तिथून ते धाराशिव जिल्ह्याकडे रवाना होणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता धाराशीवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावात तर दुपारी दीड वाजता वाशी तालुक्यातील पारगावात उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा नियोजित आहे.
याशिवाय ते बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही जाणार आहेत. बीडमधील कुर्ला येथे दुपारी दीड वाजता, जालनाच्या अंबड तालुक्यातील महाकाळा येथे साडेचार वाजता तर सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील रजापूर गावात जाऊन उद्धव ठाकरे पाहणी करणार आहेत. याशिवाय शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. Uddhav Thackeray |
हेही वाचा:
केंद्रात मंत्री होणार? थेट प्रश्नावर CM फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं; म्हणाले ” जेव्हा दिल्लीत….”





