रणनीती ठरली…! पावसाळी अधिवेशना आधी मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे घेतली सर्व आमदारांची ‘बैठक’

Uddhav Thackeray । आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधी राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहे. हे अधिवेशन महायुतीच शेवटचं अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनानंतर येत्या चार महिन्यात विधानसभा निवडणूक लागणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात महायुतीकडून मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अधिवेशनात राज्यातील गंभीर प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन विरोधकांसाठी देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
विरोधकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. विरोधकांनी मु्ख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी विविध मुद्दे मांडत सरकारवर निशाणा साधला आहे. दिवसभरातील या घडामोडींनंतर आता राजकीय घडामोडींना खरा वेग आलेला आहे. कारण मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या हालचाली घडत आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वीचे शेवटचे अधिवेशन असल्याने या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाची काय रणनीती असणार? यावर या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील जनतेचे प्रश्न कोणते प्रश्न हाती घेवून आवाज उठवायचा याबद्दल उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करत आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते आणि दोन्ही सभागृहातील आमदार या बैठकीत उपस्थित आहेत. पण खासदार संजय राऊत या बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती मिळत आहे.





