उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीने हा घेतला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१८ रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नसल्याने घटनात्म पेच निर्माण झाला होता. संविधानाच्या कलाम १६४-४ नुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहा महिन्यात राज्यात कोणत्याही सभागृहात निवडून येणे अनिवार्य आहे. तरच त्यांना मुख्यमंत्री पदी राहता येणार आहे.
\n