Uddhav Thackeray On Narendra Modi – शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आणि भाजपला त्यांनी भ्रष्ट जनता पार्टी अशा नावाने संबोधले. इलेक्टोरल बॉंड घोटाळ्यातून त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर उघड झाला आहे असा दावाही त्यांनी केला आहे. । Narendra Modi Family
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या ‘मोदी का परिवार’ मोहिमेवरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की मोदींना परिवाराचा अर्थ समजत नाही. कारण परिवार म्हटले की एखाद्याला एखाद्याला ‘परिवार’ ची जबाबदारी घ्यावी लागते. मोदींच्या परिवारात फक्त मोदी आणि त्यांची खुर्ची या दोनच बाबी समाविष्ट आहेत असे ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले. । Uddhav Thackeray On Narendra Modi
ठाकरे म्हणाले की, कोविड काळात मी मुख्यमंत्री असताना ‘मेरा परिवार, मेरी जिम्मेदारी’ (माझा परिवार, माझी जबाबदारी) असा संकल्प केला होता. परिवारात तुम्हाला सगळ्यांचीच काळजी घ्यावी लागते ही एक मोठी जबाबदारी असते असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या ‘लोकशाही वाचवा’ रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी दिल्लीत आले आहेत, त्या निमीत्त ते पत्रकारांशी बोलत होते.
त्यांनी दावा केला की भाजपकडे आता कोणतीही विषय उरलेला नाही, कारण निवडणूक रोख्यांच्या तपशीलांमुळे त्यांचा मुखवटा फाटला आहे आणि त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. भाजप हा सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचे समोर आले आहे असे ते म्हणाले. ज्या नेत्यांवर यापूर्वी भाजपने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते त्या नेत्यांचे भाजपमध्ये स्वागत केल्याबद्दलही ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप कोणी केले? आदर्श घोटाळ्याचे आरोप कोणी केले? जनार्दन रेड्डी आणि नवीन जिंदाल यांच्यावर कोणी आरोप केले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केले. अटलबिहारी वाजपेयींची भाजप वेगळी होती आणि ती तत्त्वांवर काम करायची, आता भाजप भ्रष्टांच्या पाठीशी आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. । Uddhav Thackeray On Narendra Modi