Uddhav Thackeray – राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. मतदारांनी स्पष्ट कौल देताना तेलंगणाची सत्ता कॉंग्रेसकडे, तर इतर तिन्ही राज्यांची सत्ता भाजपकडे सोपवली. आता त्या राज्यांत स्पष्ट बहुमत असणाऱ्या सरकारांची सत्ता स्थापना होईल.
दरम्यान, मध्य प्रदेशच्या या विजयामागील सर्व कारणांसोबतच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan ) यांची ‘लाडली बहना’ योजना ( ladli behna yojana ) ही ट्रम्प कार्ड मानली जात आहे, जी त्यांनी निवडणुकीपूर्वीच आणली होती. याचा त्यांना मोठा फायदा झाल्याचं आपण या निवडणुकीच्या निकाला दरम्यान पाहिलं आहे.
भाजपच्या या योजनेचं देशभर कौतुक होत असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी या योजनेवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार्टी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘लाडली बहना’ योजनेच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले की, “लाडली बहना ठिक ( ladli behna yojana ) आहे. पण गेल्यावर्षी मुंबईत अत्याचार वाढले त्याचं काय? लाडली बहना ही फक्त मध्यप्रदेशातच आहे का? त्याचा लाभ मणिपूरमध्ये का होत नाही? महाराष्ट्रात का होत नाही? बहीण ही बहीण असते. लाडली बहना मध्यप्रदेशात यशस्वी होत असेल तर मुंबईत का होत नाही? मुंबईत अत्याचार का होत आहेत? मग मुंबईतील महिला या बहना नाहीत का?’ असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
नेमकी काय आहे? ‘लाडली बहन योजना’ वाचा….
मध्य प्रदेशमध्ये, शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने महिलांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे संगोपन आणि महिलांचे स्थान मजबूत करण्याच्या उद्देशाने 2023 ची सुरुवात 28 जानेवारी रोजी केली आहे. कुटुंबात ‘मुख्यमंत्री लाडली बहन योजना’ जाहीर करण्यात आली आणि ती 15 मार्च रोजी सुरू करण्यात आली.
या योजनेंतर्गत, सुरुवातीला लाभार्थी महिलांना प्रति महिना 1,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती, जी सहा महिन्यांनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 1,250 रुपये प्रति महिना केली. राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना सध्या या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यानुसार महिलांना वर्षाला 15 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
सर्व जातीतील गरीब महिला लाडली बहना योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा नाही, म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करू शकता. योजनेचे अर्ज ग्रामपंचायत, प्रभाग कार्यालय आणि कॅम्प येथून मिळू शकतात.