Uddhav Thackeray : “सत्तेची भीती वाटत असेल तर ती उलथवली पाहिजे” ; उद्धव ठाकरेंचे महत्वाचे विधान

Uddhav Thackeray : देशात पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पातळीपासून ते राज्यातील छोट्या पक्षांपर्यंत जय्यत तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातच राज्यात आता राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्षात कार्यकर्त्याचा प्रवेश होताना दिसून येत आहे. आज पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली आहे.
पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह पाचोरा येथील स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी उपस्थित होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवेश कणाऱ्या सर्व नेत्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना, उद्धव ठाकरे यांनी,”सत्तेला घाबरत असाल तर काही करू शकत नाही. सत्तेची भीती वाटत असेल तर ती उलथवली पाहिजे. सत्ता आपली वाटली पाहिजे. नवं वर्ष सुरू होतोय हे वर्ष लोकशाहीची जावो,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी आज मातोश्री निवासस्थानी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधला. pic.twitter.com/RThTwEpxrZ
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 29, 2023
पुढे त्यांनी, “शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करतो. वैशाली ताई यांचं कौतुक वाटतेय. आर ओ पाटील आमचा भक्कम माणूस होता. त्यांचे जाणे आघात होता. पण त्यांचा वारसा वैशाली ताई पुढे नेतायत, असे उद्धव टाकरे म्हणाले. ” पक्षप्रवेशावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी संजय राऊत म्हणाले की, आपल्याकडे पक्ष नाही. चिन्ह नाही. तरी लोक पक्ष प्रवेश करत आहेत. हाच वारसा वैशाली पाटील पुढे नेहत आहेत. उद्धव ठाकरेंचं बळ वाढवतय. शिवसेना सत्तेला लाथ मारते, असे संजय राऊत म्हणाले.
पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झालाय. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने पक्षप्रवेश झाला. स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नामुळे हा पक्षप्रवेश झाला आहे.





