उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का ! निवडणुकीच्या तोंडावर ‘हा’ मासा लागला गळाला

मुंबई : विधानसभेच्या निवडणूका येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. निवडणुकीच्या अगोदर भाजपचा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या गळाला लागला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी लांडगे हे उद्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे भाजपला मोठा बसला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पूत्र रवी लांडगे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुंबईतील मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश करणार आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजप रुजवली. महापालिकेमध्ये अंकुशराव लांडगे यांनी भाजपचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले, यानंतर लांडगे घराण्याचे राजकीय वारस म्हणऊन रवी लांडगे पुढे आले.2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
रवी लांडगे आणि त्यांचे कुटुंबीय पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावार म्हणून ओळखले जातात. मात्र आता ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.





