Uddhav Thackeray। मागच्या विधासभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजपाचं नेमकं बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली हे आजपर्यंत बऱ्याच वेळा समोर आलीय. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने परस्परविरोधी दावे केले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह यांच्या २०१९ मधील ‘मातोश्री’ वरील भेटीवेळी काय घडलं होतं याबाबत काही दावे केलेत.
“त्याच्या डोक्यात मुख्यमंत्रीपद वगैरे घालू नका” Uddhav Thackeray।
या भेटीच्या वेळी काय घडलं हे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणूक होईपर्यंत आदित्यने निवडणूक लढवण्याचा विचार केला नव्हता. त्यानंतर त्याने विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार केला. त्यावेळी फडणवीसांनी कोपराला गुळ लावण्याचा प्रयत्न केला. ते मला म्हणाले, “उद्धवजी मी काय करतो, मी आदित्यला चांगला तयार करतो. आपण अडीच वर्षांनी त्याला मुख्यमंत्री करू”. मी त्यांना म्हटलं, आदित्य अजून लहान आहे, त्याच्या डोक्यात काहीतरी घालू नका. त्याला आधी आमदार म्हणून त्याची कारकीर्द सुरू करू द्या. तुम्ही त्याला नक्कीच तयार करा. मात्र मुख्यमंत्रीपद वगैरे त्याच्या डोक्यात घालू नका.
उद्धव ठाकरे म्हणाले, त्यावेळी मी फडणवीसांना विचारलं, तुम्ही इतके ज्येष्ठ नेते आहात आदित्यला मुख्यमंत्री केल्यानंतर तुम्ही त्याच्या हाताखाली काम करणार? त्यावर ते म्हणाले, “मी दिल्लीला जाणार, मला अर्थखात्यातलं जरा बरं कळतं.” म्हणजेच फडणवीसांना केंद्रीय अर्थमंत्री व्हायचं होतं. मी त्या सगळ्याच्या खोलात जात नाही. मी त्यांचं बिंग फोडल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना आज ते चरफडले.
ते म्हणाले, “उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झाले आहेत.” आधी ते म्हणाले, उद्धव ठाकरे अमित शाह यांना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले. मग म्हणाले, देवेंद्रने शब्द दिला. अहो, देवेंद्र जनाची नाही, मनाची तरी ठेवा. त्या दोन्ही तुम्हाला नाहीत हे आम्हाला माहितीय. लाजलज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे हा. जिला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे. तुम्ही कुठल्या खोल्यांमध्ये काय करता ते आम्ही बघू इछित नाही.
तू बाहेर बस. दोन मोठी माणसं बोलत Uddhav Thackeray।
ठाकरे गटाचे प्रमुख म्हणाले, फडणवीस ज्याला कुठलीतरी खोली म्हणतायत ते मातोश्रीतलं मंदिर आहे, कारण ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खोली आहे. त्याच खोलीत अमित शाह बाळासाहेबांच्या फोटोसमोर नाक रगडायला आले होते. त्या खोलीत अमित शाहांनी तुम्हाला नो एंट्री केली होती. अमित शाह तुम्हाला म्हणाले, तू बाहेर बस. दोन मोठी माणसं बोलत आहेत त्यामुळे तू बाहेर बस. त्याच खोलीत अटल बिहार वाजपेयी आले होते. लालकृष्ण आडवाणी आणि राजनाथ सिंह आले होते. तिथेच प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यायचे. त्या खोलीचं तुला महत्त्व माहिती नाही आणि तू नालायक माणसा त्या खोलीला कुठलीतरी खोली म्हणतोयस. मी तुला नालायक आणि कोडगा म्हणतोय. कारण माझ्या त्या खोलीबद्दलच्या भावना संवेदनशील आहेत.