सातारा: खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा लोकसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार शिवेंद्रराजे भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती. महायुतीकडून यापुर्वीच नरेंद्र पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आज मंगळवारी सकाळी 9 वाजता कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदारांच्या उपस्थितीत गांधी मैदान येथून रॅलीला सुरूवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने साताऱ्यात केलेल्या शक्तीप्रदर्शनाने लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे साहजिकच पाटील यांना उदयनराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा लोकसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्यासोबत विधिमंडळ पक्षनेते @AjitPawarSpeaks, काँग्रेस नेते @prithvrj, आ. @shindespeaks, आमदार शिवेंद्रराजे भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती. #LokSabhaElections2019 #NCP2019 pic.twitter.com/aDCRXeH9Rz— NCP (@NCPspeaks) April 2, 2019