उदयनराजे अब्जाधीश उमेदवार

एक अब्ज 16 कोटी 35 लाखांची शेतजमीन, 37 किलो सोने

उदयनराजेंकडे 1 अब्ज 16 कोटी, 35 लाख 73 हजार रूपये किमतीची शेतजमीन असून 18 कोटी 31 लाखांची बिगरशेती जमीन आहे. तसेच 26 लाख 37 हजारांच्या वाणिज्य इमारती तसेच 22 क ोटी 31 लाख 92 हजारांची निवासी इमारती अशी एकूण त्यांच्याकडे एक अब्ज 57 कोटी 25 लाखांची संपत्ती आहे. उदयनराजेंवर 35 लाख 69 हजार रूपयांचे वैयक्‍तिक कर्ज आहे.

सातारा  – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे 12 कोटी 31 लाख 84 हजारांची जंगम, तर एक कोटी 13 लाख नऊ हजार रुपायांची स्थावर मालमत्ता आहे. एक अब्ज 16 कोटी 35 लाखांची शेतजमीन आहे. त्यांच्याकडे 37 किलो सोने असून, त्यांची किंमत एक कोटी 33 लाख 75 हजार रुपये आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी 2017-2018 मध्ये 1 कोटी 15 लाख 71 हजार रूपयांचे करप्राप्त उत्पन्न दर्शविले आहे. पत्नी दयमंतीराजे यांनी आठ लाख 72 हजार 774 रूपयांचे करप्राप्त उत्पन्न तर हिंदू अविभक्‍त कुटुंब 16 लाख 13 हजार रूपयांचे करप्राप्त उत्पन्न दाखविले आहे. उदयनराजेंकडे 18 लाख 15 हजार 850 रूपये तर पत्नी दयमंतीराजे भोसले यांच्याकडे एक लाख 57 हजार 023 रूपये तर अविभक्‍त कुटुंब म्हणून तीन लाख 25 हजार 691 रूपयांची रोकड आहे. तर विविध बॅंकामध्ये उदयनराजेंच्या 29 लाख 76 हजार 166 रूपयांच्या ठेवी असून पत्नी दयमंतीराजें च्या नावे बॅंकेत 38 लाख 83 हजार 970 रूपये अविभक्‍त हिंदू कुटुंबाच्या नावे बॅंकेत 21 लाख 15 हजार रूपयांची रक्‍कम शिल्लक आहे.

विविध शेअर्स, म्युच्युअल फंड आदींमध्ये उदयनराजेंच्या नावे एक कोटी 41 लाख 86 हजार रूपये गुंतवलेले आहेत. तर पत्नी दयमंतीराजेंच्या नावे बिटकॉनमध्ये चार लाखांची गुंतवणूक आहे. विविध संस्था कंपनी व भागीदारी संस्थाना दिलेल्या रकमा आठ कोटी 16 लाख 54 हजार रूपयांच्या आहेत. उदयनराजेंकडे 91 लाख 70 हजारांच्या चार अलिशान गाड्या आहेत. यात ऑडी, मर्सिडिज बेन्ज, इन्डिवर, मारूती चिप्सी या गाड्यांचा समावेश आहे, तर पत्नी दयमंतीराजेंच्या नावे पोलो ही चार लाखांची गाडी आहे. उदयनराजेंकडे एक कोटी 33 लाख 75 हजारांचे 37 किलो सोने आहे, तर पत्नी दयमंतीराजेंकडे 32 लाख 98 हजारांचे विविध दागिने आहेत.तर हिंदु अविभक्‍त कुटुंबाकडे 23 लाख 61 हजारांचे दागिने आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.