सातारा -नवी दिल्ली येथील संसद भवनात खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यपदाची शपथ घेतली. उदयनराजेंच्या शपथविधीनंतर साताऱ्यात त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. उदयनराजे भोसले राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकसभेवर विजयी झाले होते. मात्र, काही महिन्यांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. राज्यातील विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूूक झाली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या उदयनराजे यांना पराभूत केले होते. उदयनराजे यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिली. बुधवारी संसद भवनात उदयनराजे यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.