U17 World Wrestling C’Ship 2024 : जागतिक स्पर्धेत भारतीय महिला युवा कुस्तीपटूंचा दबदबा; एक-दोन नव्हे तर जिंकली 4 सुवर्णपदके…

Under-17 World Wrestling Championships 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील कुस्तीपटूंच्या जोरदार कामगिरीनंतर पुन्हा एकदा कुस्तीचे मैदान गाजत आहे. ऑलिम्पिकमधून यावर्षी अमन सेहरावतने भारताला एक पदक मिळवून दिले. तर विनेशही पदक मिळवणारच होती पण अखेरच्या क्षणी ती अधिक वजनामुळे अपात्र ठरली. पॅरिस ऑलिम्पिकनंतर आता भारतीय कुस्तीपटूंनी 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धा 2024 मध्ये आपली ताकद दाखवली आहे. या स्पर्धेत भारताने 4 सुवर्णांसह एकूण 6 पदके जिंकताना जॉर्डनमध्ये तिरंगा फडकावला आहे.
जॉर्डनमधील अमन येथे 17 वर्षांखालील जागतिक कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे. अदिती कुमारी, नेहा सांगवान, पुलकित आणि मानसी लाठर यांनी भारतासाठी वेगवेगळ्या वजनी गटात सुवर्णपदके जिंकली आहेत. तर रौनक दहिया आणि साईनाथ यांनी कांस्यपदक पटकावले आहे. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियानेही या सर्वांचे एक्स वर अभिनंदन केले आहे.
World champions
देश की गोल्डन बेटियां!
अदिति 🥇
मानसी लाठर 🥇
और पुलकित🥇
नेहा सांगवान🥇
जॉर्डन की राजधानी अमाम में चल रहे UNDER 17 WORLD WRESTLING में गोल्ड मेडल जीत के देश का नाम रोशन किया।
बहुत बहुत शुभकामनाएं 🔥🔥🥇Aditi Kumari – 43kg
🥇Neha Sangwan – 57kg
🥇Pulkit -… pic.twitter.com/9AsIigDPZe— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) August 23, 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला एकही सुवर्णपदक मिळाले नाही. पण 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या युवा कुस्तीपटूंनी आतापर्यंत 4 सुवर्णपदके मिळवली आहेत. अदिती कुमारीने महिलांच्या फ्रीस्टाइल 43 किलो गटात भाग घेतला होता. तिने अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. नेहाने महिलांच्या फ्रीस्टाइल 57 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. पुलकितने महिलांच्या फ्रीस्टाइल 65 किलो गटात तर मानसीने 73 किलो गटात सुवर्णपदक पटकावले आहे.
यामध्ये 43 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत आदिती कुमारीने ग्रीसच्या मारिया लुईझा गिका हिचा 7-0 असा तर फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नेहाने जपानच्या सो त्सुत्सुईचा 10-0 ने पराभव केला. अन्य लढतीत म्हणजेच 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पुलकितने डारिया फ्रोलोव्हा या तटस्थ खेळाडूचा 6-3 असा तर मानसी लाथेरने 73 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत हाना पिरस्काया हिचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
तसेच याव्यतिरिक्त भारताने दोन कांस्यपदके जिंकली आहेत. रौनक दहियाने ग्रीको-रोमन 110 किलो गटात तर साईनाथने ग्रीको-रोमन 51 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे.
जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप-2024 मधील भारताचे पदक विजेते..
सुवर्णपदक विजेते..
1. अदिती कुमारी (महिला फ्रीस्टाइल 43 किलो)
2. नेहा सांगवान (महिला फ्रीस्टाइल 57 किलो)
3. पुलकित (महिला फ्रीस्टाइल 65 किलो)
4. मानसी लाठेर (महिला फ्रीस्टाइल 73 किलो)
KL Rahul Retirement : केएल राहुलच्या निवृत्तीची बातमी होत आहे व्हायरल..! जाणून घ्या, काय आहे सत्य…
कांस्यपदक विजेते…
1. रौनक दहिया (ग्रीको-रोमन 110 किलो)
2. साईनाथ पारधी (ग्रीको-रोमन 51 किलो)


