U12 Champs Trophy : एके व एजीएस क्रिकेट अकादमीत अंतिम लढत…

Champs Trophy in Under 12 Cricket Tournament :- चॅम्प्स स्पोर्टस फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित चॅम्प्स करंडक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत एजीएस क्रिकेट अकादमी संघाने तिसऱ्या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला.
धायरी येथील सहारा क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत तनुश चट्टीयार(४-१५ व २९धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एजीएस क्रिकेट अकादमी संघाने क्रिकेट स्ट्रायकर्स अकादमी अ संघाचा ८२ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली.
दुसऱ्या सामन्यात स्वरा गुरव(५४धावा) हिने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर एके स्पोर्टस अकादमी संघाने क्रिकेट स्ट्रायकर्स अकादमी ब संघाचा ९० धावांनी पराभव करून चौथ्या विजयाची नोंद केली.
साखळी फेरी :
एके स्पोर्टस अकादमी: २५ षटकांत ९बाद १९५ (स्वरा गुरव ५४, प्रणय आवळे ३३, अर्णव जगताप २३, विराज जवळकर १८; मधुर मंडोरे २-१८, मनस्वी सोर्टे २-३३) वि.वि.क्रिकेट स्ट्रायकर्स अकादमी ब: २५ षटकात ५बाद १०५ (सुश्रुत पुरंदरे ४२, कार्तिक पासलकर १२; अर्णव कुलकर्णी २-१०); सामनावीर – स्वरा गुरव.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/keshav-maharaj-visits-ram-mandir-in-ayodhya-ahead-of-ipl-2024-post-goes-viral/
एजीएस क्रिकेट अकादमी: २५ षटकांत सर्वबाद १६७ (रियान सुलाखे ३१, तनुश चट्टीयार २९, अंबर लावंड २९; नील धडफळे ३-२८, शिवेन फांड्रे २-२०) वि.वि. क्रिकेट स्ट्रायकर्स अकादमी अ: २२.४ षटकांत सर्वबाद ८५ (अर्णव खिरीड १७, नील धडफळे १३; तनुश चट्टीयार ४-१५, रियान सुलाखे २-१९); सामनावीर – रियान सुलाखे.




