श्रीनगर – सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मिरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. या चकमकीत दोन सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
#UPDATE Joint operation in Chingam area of Kulgam district has concluded. Total two terrorists eliminated. One M4 rifle & one pistol recovered: Defence PRO, Srinagar. #JammuAndKashmir https://t.co/TP5PAd63W4
— ANI (@ANI) October 10, 2020
कुलगाम जिल्ह्यातील चिंगम परिसरामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार जवानांनी परिसराला घेराव घालून शोधमोहिम सुरू केली.
#UPDATE Two unidentified terrorists killed in the ongoing encounter between security forces and terrorists in Chingam area of Kulgam district: Kashmir Zone Police. #JammuAndKashmir https://t.co/Ma7XjFQ227
— ANI (@ANI) October 10, 2020
यावेळी चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले.
An encounter between security forces and terrorists is underway in Chingam area of Kulgam district. Further details shall follow: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) October 10, 2020
दरम्यान, मागील आठवड्यात पाकिस्तानी सैनिकांनी कुपवाडा जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ गोळीबार व तोफगोळ्यांनी मारा केला होता. यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते.