ज्योतिरादित्य शिंदेंच्या दोन समर्थकांची मंत्रिमंडळात वर्णी

भोपाळ – मध्यप्रदेश सरकारचा आज विस्तार करण्यात आला. यावेळी ज्योतिरादित्य समर्थकांपैकी दोन जणांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. तुलसीराम सीलवंत आणि गोविंद रजपूत अशी या दोन मंत्र्यांची नावे असून राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना अधिकारपदाची शपथ दिली.

मार्च 2020 मध्ये शिवराजसिंह चौहान यांचे मंत्रिमंडळ सत्तेवर आल्यानंतर झालेला हा तिसरा विस्तार आहे. सीलवंत आणि रजपूत यांचा पहिल्या विस्तारात राज्यमंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

पण पहिल्या सहा महिन्याच्या अवधीत त्यांनी विधीमंडळातील कोणत्याच सभागृहात वर्णी लागू शकली नव्हती म्हणून त्यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. पण दरम्यानच्या काळात त्यांची पोटनिवडणुकांमध्ये पुन्हा विधानसभेत वर्णी लागल्यानंतर त्यांना विलंबाने पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.