पालघर – पालघर स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दीड कोटी रुपये किमतीचे मांडूळ प्रजातीचे दुर्मिळ दोन साप जप्त केले आहेत. या प्रकरणी सापळा रचून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पालघरजवळील मनोर येथे ही कारवाई करण्यात आली.
पालघर तालुक्यातील पोचाडे येथील एका घरात दुर्मिळ प्रजातीचे साप ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पोचडे येथील एका घरात हे दुर्मिळ प्रजातीचे साप आढळून आले. वाइल्ड लाइफ वॉर्डन यांच्या परवानगीशिवाय मांडूळ प्रजातीचे २ दुर्मिळ साप बाळगल्याप्रकरणी २ आरोपींना पालघर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे.
Maharashtra: Two rare Mandul snakes were seized from the possession of two smugglers in Pochade Village of Palghar yesterday. Both the smugglers have been arrested. pic.twitter.com/UZKkosLsDU
— ANI (@ANI) April 3, 2019