परभणीत अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू
Updated On:

परभणी : परभणीमधील मानवत येथे अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मानवत शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह व विजांचा गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली.
या पावसात झरी येथील दिगंबर किशोरराव सत्वधर आणि संतोष झांबरे हे दोघे शेतात बैल चालण्यासाठी गेले होते. पाऊस आल्यामुळे ते बैलांना बाजूला सोडून निवाऱ्यासाठी एका झाडाखाली जाऊन थांबले. याच वेळी एक विज कडकडून त्यांच्या अंगावर पडली व यात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.





