सातारा – जिल्ह्यात बुधवारी (दि. 10) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 94 नागरिकांना करोनाची बाधा झाली असून, गेल्या 24 तासांत दोन बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गुरुवारी दिली. जिल्ह्यात बाधितांचा आकडा पुन्हा वाढल्याने करोनाचे सावट कायम आहे. वयोवृद्ध नागरिकांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या 57 हजार 207 झाली असून करोनामुळे आतापर्यंत 1833 नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर अजूनही तीन टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात मल्हार पेठ, गोडोली प्रत्येकी एक, संभाजीनगर, कळंबे, पानमळेवाडी प्रत्येकी दोन, मालगाव, नागठाणे, वर्णे प्रत्येकी एक, वाई तालुक्यामध्ये वाई शहरात फुलेनगर, रामडोह आळी, सिद्धनाथवाडी प्रत्येकी एक, इतरत्र तीन, पसरणी चार, सुरुर, व्याजवाडी, लोहारे, बोरगाव, चिखली प्रत्येकी एक, फलटण तालुक्यात वाठार निंबाळकर एक, जावळी तालुक्यात कापसेवाडी दोन, मेढा, रानगेघर, सोमर्डी, महाते प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात मांडवे दहा, नेर, कातरखटाव प्रत्येकी पाच, येरळवाडी तीन, वडूज, पुसेगाव, एनकूळ प्रत्येकी दोन, लाडेगाव एक, कोरेगाव तालुक्यात सासुर्वे नऊ, दहिगाव, रहिमतपूर प्रत्येकी एक, माण तालुक्यात दहिवडी नऊ,
महाबळेश्वर तालुक्यात पाचगणी एक, खंडाळा तालुक्यात लोहोम, पारगाव प्रत्येकी एक, इतर सहा, बाहेरील जिल्ह्यातील सांगली एक, असे 94 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना सगुणामातानगर, ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष व करंजे पेठ, सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला.