एसटीची 10 टक्के भाडेवाढ अजून दोन दिवस
Updated On:

पुणे – दिवाळीच्या तोंडावर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी) तिकीट दरात 10 टक्के वाढीचा निर्णय घेतला होता. ही वाढ अजून दोन दिवस राहणार आहे. त्यानंतर हे प्रवासी भाडे नियमित होणार आहे.
एस.टी. भाडेवाढ दि.25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान लागू असणार आहे. यामध्ये साधी बस, सेमी (एशियाड) आणि शिवशाही आसनी बससाठी 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. तर, शिवनेरी, शिवशाही स्लीपर व अश्वमेध या बससाठी भाडेवाढ करण्यात आली नाही. यंदा विधानसभेच्या निवडणुकीमुळे एस.टी. महामंडळाने दरवाढ उशिरा जाहीर केली होती.





