रिओ द जानेरिओ – भारतातून ब्राझीलला करोना लसीचे दोन दशलक्ष डोसेस देण्यात आले असून हे डोस तेथे दाखल झाले आहेत. तथापि त्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तेथे पुरवण्यात आलेले हे डोस अपुरे आहेत.
ब्राझीलची लोकसंख्या सुमारे 21 कोटी इतकी आहे. त्यांनी अन्य देशांतूनही ही लस प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांना त्या प्रमाणात ही लस मिळालेली नाही. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतच त्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला असून ही उपलब्धता कोठून वाढवायची हा त्या देशाच्या सरकारपुढील मोठा प्रश्न आहे.
तशातच भारतातून ही लस घेऊन येणाऱ्या विमानाला तब्बल एक आठवडा उशीर झाला. त्यामुळे लसीकरणासाठी करण्यात आलेली पहिली तयारी वाया गेली. आता तेथे पुन्हा नव्याने तयारी करून हे 20 लाख डोस संबंधितांना वितरित केले जाणार आहेत.