खोडशी येथील अपघातात दोन जखमी

कराड (प्रतिनिधी) – खोडशी, ता. कराड येथील श्रीराम मंगल कार्यालयजवळ सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास चारचाकी गाडीवरील क्रमांक (एमएच. 43, इए, 4452) चालकांचा ताबा सुटल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी की, मुंबईवरून कराडच्या दिशेने येणारी वॅगनार चारचाकी गाडीवरील चालकांचा ताबा सुटला. राष्ट्रीय महामार्गावर गाडीने तीन कोलांट्या खाल्या. या अपघतात बाजीराव विठ्ठल यादव (वय 52, रा बनपूरी, ता. पाटण), चंद्रकांत घारे (वय 42, रा. घारेवाडी, ता. कराड) हे दोघे जखमी झाले आहेत. तर चालक आश्विन नंदकुमार मोहिते (वय 32, रा. भुंईज,ता. वाई) हा अपघातात सुरक्षित आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावरून जखमींना हायवे हेल्पलाइनचे दस्तगीर आगा, अमित पवार, सलिम देसाई, योगेश पवार, विक्रम सावंत यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. कराड शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी जाधव व इनामदार यांनी घटनास्थळांचा पंचनामा केला.





