Samruddhi Mahamarg Accident : संभाजीनगरला निघालेल्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गाचे उदघाटन (Samruddhi Mahamarg Accident) झाल्यापासून या ठिकाणी अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. नुकतीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. या अपघातानंतर कार थेट बॅरिकेट्सला धडकली. त्यानंतर पलटी झाली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉर जवळ क्रमांक 481 जवळ कार चालकाला डूलकी लागल्याने त्याचे कार वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला. या कारमधील लाेक हे मुंबईकडून संभाजीनगरकडे येत हाेते. या अपघातात 2 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली.





