पिरंगुट -मोक्का गुन्ह्यातील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पौड पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली. विकास बाळू मालपोटे (रा. कातरखडक ता. मुळशी) व दत्ता किसन शिंदे (रा. पडळघरवाडी, रिहे ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दत्ता शिंदेस पडळघरवडी येथून, तर विकास मालपोटेस कतरखडक येथून अटक केली. पौड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल लवटे, मेहबूब शेख, अब्दुल शेख, रॉकी देवकते, जय पवार, अक्षय नलावडे, सुनील कदम, नाना मदने, रवींद्र जाधव, सागर नामदास असे पथकाने ही कारवाई केली.