पिंपरी | दोन किलो गांजासह दोघांना अटक
Updated On:

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पाेलिसांच्या अंमली विरोधी पथकाने सुमारे सव्ाा दोन किलो गांजासह दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अंमली विरोधी पथकाचे पोलीस नाइक विलास दिपक दौंडकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नूर महिताब अली शेख, (वय २८, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी), गणेश विनायक काटे, (वय ३२, रा. गणेशनगर, दापोडी) या दोघांना अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशनगर येथील गणेश गार्डन सोसायटीत रस्याच्या कडेला कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून दोन किलो दोनशे ग्रॅम गांजा, रोख रक्कम असा एक लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.





