पिंपरी | बैलाची कत्तल केल्याप्रकरणी दोघांना अटक
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – चाकण येथील बाजारातून बैल खरेदी करून तो कत्तलीसाठी विकला. तसेच त्या बैलाची कत्तल करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार 15 ते 18 जून या कालावधीत चाकण येथे घडला. हसनभाई जाफरभाई मुंढे (वय 55, रा. चाकण), सरवर अजिज शेख (वय 35, रा. खंडोबा माळ, चाकण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहिदास मोरमारे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हसनभाई मुंढे याने चाकण बैल बाजारातून कत्तलीसाठी बैल खरेदी केला.
तो बैल त्याने आरोपी सरवर शेख याला कत्तलीसाठी विकला. सरवर शेख याने तो बैल बीड जिल्ह्यातील पिंपळगाव ता. माजलगाव येथे नेऊन त्याची कत्तल केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.





