इगतपुरी-कसारादरम्यान ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार, दोघांना अटक
Updated On:

कल्याण: लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. इगतपुरी ते कसारा या स्थानकांदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून आता पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दरोडा पडला. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करत प्रवाशांना लुटले. 15 ते 20 प्रवाशांना यावेळी लुटण्यात आले. तसेच ट्रेनमध्ये असणाऱ्या 20 वर्षांच्या तरुणीवर दरोडेखोरांनी अत्याचार केले.
या धक्कादायक प्रकारानंतर कल्याण जीआरपीने गुन्हा दाखल केला असून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.





