Baramati By Election 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं आव्हान दिलं होतं. मात्र आता बारामती पोटनिवडणुकीत ट्वीस्ट आल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण हाके यांनी आपला उमेदवारी अर्ज न भरता निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे हाके यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केल्याचे समजते. Baramati By Election 2026 लक्ष्मण हाके हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बारामतीत दाखल झाले होते. मात्र, त्याच वेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली भावनिक परिस्थिती आणि बारामतीचा विकास लक्षात घेऊन ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भरणे यांनी हाके यांची मनधरणी केली. त्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज बारामतीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला मंत्री दत्ता भरणे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या विनंतीनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. Baramati By Election 2026 लक्ष्मण हाके काय म्हणाले? Baramati By Election 2026 लक्ष्मण हाके म्हणाले, ‘आम्ही बारामतीत काही प्रश्नाबाबत निवडणुकीत उतरणार होतो. ओबीसी नेता म्हणून मी लढत होतो. मी विद्रोही आक्रमकपणे भूमिका मांडत होतो. मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री उदय सामंत, मंत्री भरणे मामा यांनी मला विनंती केली. Baramati By Election 2026 सुनेत्रा ताई पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उदय सामंत, धनंजय मुंडे आणि दत्ता भरणे या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला. या सर्वांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर मी विचार केला. सुनेत्रा पवार यांचा ज्यावेळेस मला फोन आला, त्यावेळेस मी ठरवले की नाही. इतके सगळे लोक आपल्याला फोन करत असतील तर आपण विचार करायला हवा. त्यामुळे मी ठरवले की, आपण थांबायला पाहिजे,” असे म्हणत हाके यांनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली. Baramati By Election 2026 लक्ष्मण हाके यांनी, आमच्या मागण्याबाबत मी समाधानी नाही. मी माझ्या प्रश्नावर ठाम राहणार आहे. मी माझे प्रश्न आक्रमकपाने मांडतच राहणार असल्याचे देखील स्पष्ट केले. दरम्यान, महायुतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र, आता हाके यांच्या माघारीनंतर सुनेत्रा पवारांसमोर काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांचे आव्हान असणार आहे. Baramati By Election 2026 हेही वाचा: Baramati Byelection 2026: काँग्रेसचे आकाश मोरे बारामती पोटनिवडणूकीसाठी रिंगणात; सुनेत्रा पवारांविरोधात माघार घेण्यासाठी ठेवली मोठी अट