Twinkle Khanna : ट्विंकल खन्नाचा ५२ व्या वर्षी ग्लॅमरस अंदाज; पती अक्षयकुमारसोबतचा Video व्हायरल
Twinkle Khanna : अक्षय कुमार आणि ट्विंकल मुंबईतील वांद्रे भागात स्पॉट

Twinkle Khanna : अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील पावरफुल जोडप्यांपैकी एक मानले जातात. नुकतेच या जोडप्याला मुंबईतील वांद्रे भागात स्पॉट करण्यात आले. या दरम्यान अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला. या कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काल रात्री अक्षय कुमार आपली पत्नी ट्विंकल खन्नाला वांद्रे येथे डिनर डेटसाठी घेऊन गेला होता. त्यानंतर दोघे रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. डिनर डेटसाठी अक्षय आणि ट्विंकल अत्यंत स्टायलिश लूकमध्ये दिसत होते. या दोघांमधील केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
View this post on Instagram
५२ व्या वर्षीही ट्विंकल खन्नाचा ग्लॅमरस अंदाज
अक्षय कुमारच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, त्याने लाईट ब्लू रंगाचा पट्टेरी शर्ट, डेनिम जीन्स आणि व्हाईट स्नीकर्स परिधान केले होते. तर याच्या ५२ व्या वर्षीही ट्विंकल खन्ना खूप सुंदर दिसत होती. तिने ब्लॅक टॉप आणि व्हाईट स्कर्ट परिधान केला. तर तिने आपला लुक ब्राऊन बेल्ट आणि स्टायलिश हँडबॅगसह पूर्ण केला होता.
अक्षय आणि ट्विंकल यांनी १७ जानेवारी २००१ रोजी लग्नगाठ बांधली होती. या दांपत्याला आरव हा मुलगा आणि नितारा ही मुलगी आहे. या दोघांची लव्ह स्टोरी १९९९ मध्ये आलेल्या ‘इंटरनॅशनल खिलाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरू झाली होती.
हेही वाचा:
LPG Rate Today: घरगुती सिलेंडरची आज किमत किती? ; वाचा नवीन किंमत





