Surbhi Jyoti : टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती झाली आई; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Surbhi Jyoti : सुरभी ज्योतीला 'कुबूल है' या टीव्ही मालिकेतून विशेष ओळख मिळाली

Surbhi Jyoti : टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती आई झाली आहे. तिने १४ जून रोजी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. सुरभीने १३ जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
सुरभीने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत ‘इट्स अ गर्ल’ असे लिहिले आहे. यासोबतच १३ जून, २०२६ ही तारीख लिहिली आहे. या पोस्टमध्ये एका गुलाबी रंगाच्या फुलासोबत एका कळीचे चित्र असून खाली ‘सुरभी आणि सुमित यांच्याकडून प्रेम’ असे लिहिले आहे.
सुरभीने या खास पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्हाला मुलगी झाली आहे… आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरून आले आहे.” या बातमींनंतर कलाकार आणि चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लग्नाच्या दोन वर्षांनंतर बनली आई
सुरभी ज्योतीने २०२४ मध्ये तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीसोबत मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. आता लग्नाच्या दोन वर्षांनंतर ते आई-बाबा झाले आहेत.
सुरभी ज्योतीला ‘कुबूल है’ या टीव्ही मालिकेतून विशेष ओळख मिळाली, ज्यामध्ये तिने ‘झोया’ची भूमिका साकारली होती. या मालिकेत ती करण सिंग ग्रोव्हरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले, पण ‘नागिन ३’ मुळे तिला लोकप्रियता मिळाली.
हेही वाचा:






