हळदी-कुंकू कार्यक्रम भाजप नगरसेविकेच्या अंगलट

पुणे – पोलिसांच्या परवानगीशिवाय हळदी-कुंकू कार्यक्रम घेणे भाजप नगरसेविकेच्या अंगलट आले आहे. करोना नियमावलीचे पालन न करता 1,800 ते 2,000 लोकांची गर्दी जमवून कार्यक्रम घेतल्याप्रकरणी भाजपच्या विद्यमान नगरसेविकेसह माजी नगरसेविकेविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

22 फेब्रुवारीला गंजपेठेतील महात्मा फुले वाडा रस्ता परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर, विष्णू हरिहर आणि निर्मल हरिहर (सर्व गुरूवार पेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.