Tunisha Sharma : अभिनेत्री ‘तुनिषा शर्मा’ने उचललं टोकाचं पाऊल; सेटवरच गळफास घेऊन संपवलं जीवन…शेवटची Instagram post व्हायरल

मुंबई – अलीबाबा दास्तान-ए-काबुल फेम अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली आहे. (Tunisha Sharma dies by suicide) या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तुनिषा ही केवळ 20 वर्षांची होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषा सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. याच मालिकेचं शूटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. सेटवर उपस्थित लोकांनी तात्काळ अभिनेत्रीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. आता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तुनिषाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
तुनिषाने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. तुनिषाने भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते. सध्या ती अलीबाबा या टीव्ही शोमध्ये काम करत होती. या शोमध्ये ती राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. तुनिषा शर्माने टीव्ही शोसह अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने फितूर, बार बार देखो, कहानी 2: दुर्गा रानी सिंह, दबंग 3 यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. तुनिषाने फितूर आणि बार बार देखो मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती. कलर्स टीव्हीवरील तिची ‘इंटरनेट वाला लव’ ही मालिका लोकांना खूप आवडली होती.
सेटवरील कलाकारांना धक्का…
तुनिषा शर्मा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. नेहमी आनंदी राहणाऱ्या आणि सेटवर सगळ्यांशी मस्ती करून बोलणाऱ्या या अभिनेत्रीने असे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. काही काळापूर्वी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करनेही अशाच प्रकारे आत्महत्या केली होती.
तुनिषाने तिच्या निधनाच्या काही तास आधी स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता. तिने त्या पोस्टसोबत लिहिले आहे की, “जो अपने जुनून से प्रेरित होते हैं वह रुकते नहीं हैं” या पोस्टवर कमेंट करताना काही चाहत्यांनी लिहिले आहे की, तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आणि एक हृदय तुटलेला इमोजी देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुनिषा तिच्या शोच्या सेटवर दिसत आहे. या फोटोमध्ये तुनिषा तिच्या शोच्या सेटवर दिसत आहे. ती स्क्रिप्ट वाचत असल्याचे दिसते. 4 दिवसांपूर्वीही तुनिषाने तिचा हसतानाचा फोटो पोस्ट केला होता आणि लिहिलं होतं की या क्षणी आनंदी राहा, इतकंच झालं.
तसं पाहिलं तर तुनिषा सोशल लाईफ जगण्यावर विश्वास ठेवायची. ती इन्स्टाग्रामवर तिच्या सेटवरून अनेक छायाचित्रे पोस्ट करायची आणि सहकलाकारांसोबत रील व्हिडिओही बनवायची.





