नागपूर: नागपूर शहरातील करोनाच्या केसेस वाढत असल्याने शहरात शनिवारी आणि रविवार या दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही उपाययोजना जाहीर केली आहे.
नागपूर महापालिकेच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा जनता कर्फ्यु सध्या तरी 25 आणि 26 जुलै या दोन दिवसांसाठीच जारी करण्यात आला असला तरी त्याचे परिणाम पाहून करोना नाहीसा होईपर्यंत तरी शहरात दोन दिवसांच्या जनता संचारबंदीची व्यवस्था कायम ठेवली जाईल असे सांगण्यात येत आहे.
नागपुरातील करोना केसेस आटोक्यात येईनाशा झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे.