Tukaram Mundhe Transfer । राज्यातील सर्वात चर्चेत राहिलेले आयएएस तुकाराम मुंढे यांनी मागच्या वर्षी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आलीय. यावेळी त्यांची विकास आयुक्त (असंघटित कामगार) (Labour) खात्याच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. सध्या मुंढे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी Tukaram Mundhe Transfer । तुकाराम मुंढेंनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट 2005 मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर, विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी कारकीर्द गाजवली. मात्र, सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रापुढे आली. जून 2023 मध्ये राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी त्यांची बदली करण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याअगोदर अवघ्या एका महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली होती. आता, आज पुन्हा त्यांनी बदली करण्यात आली आहे. 18 वर्षात 21 वेळा बदली Tukaram Mundhe Transfer । प्रशासकीय सेवा अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या सहीने तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्याच्या विकास आयुक्त (असंघटित कामगार) सचिवपदी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाल्याने ते चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दुध उत्पादक संघाच्या मालकांनी मंत्रालयात येऊन त्यांचा सत्कार केला होता. दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिल्यामुळे त्यांचे आभार मानण्यात आले होते. आक्रमक कार्यशैली तसेच तितकेच शिस्तबद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांची अनेकदा बदली झाली आहे. कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतुनं मुंढे जी पावले उचलतात, तीच त्यांच्या बदल्ंयासाठी कारण ठरतात, अशी चर्चा नेहमीच असते. तुकाराम मुंढे यांची 18 वर्षाच्या सेवेत जवळपास 21 वेळा बदली झाली आहे. ते , 2005 सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत