पिंपरी | प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला येथे क्षयरोग लसीकरण
Updated On:

कार्ला, (वार्ताहर) – जागतिक आरोग्य संघटनेने भारत २०२५ पर्यंत क्षयमुक्त करण्याचे ध्येय जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार मावळ तालुक्यात कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील रुग्णांना लसीकरण करत मोहिमेची सुरूवात करण्यात आली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन वाघमारे यांनी ग्रामस्थांना क्षयरोग टीबी लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले. जास्तीत जास्त लोकांनी ही लस घ्यावी, असे आवाहन केले.
यावेळी डॉ दत्ता तपसे, आरोग्य सेविका सुवर्णा बंडगर, दीपिका मुकादम, सागर गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.





