“मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु…”; संजय राऊतांच्या आरोपानंतर शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया

Shahajibapu Patil | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे- सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर रोकड घेऊन जाणारे वाहन राजगड पोलिसांनी सोमवारी (दि.२१) सायंकाळी ताब्यात घेतले. वाहनात नक्की किती रक्कम होती हे अजून स्पष्ट झालेले नाही.
मात्र, या वाहनात मोठी रोख रक्कम असल्याचे बोलले जात आहे. 5 कोटींची ही रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही रक्कम कोणाची? कुठे चालली होती? याबाबत राजगड पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी, निवडणूक अधिकारी कोणतीही माहिती देण्यास तयार नाही. Shahajibapu Patil |
याचदरम्यान ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर आरोप केला होता. ‘मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले. हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटीचा हा पहिला हप्ता…काय बापू… किती हे खोके?,’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं. संजय राऊतांच्या या विधानावर आता शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Shahajibapu Patil |
शहाजीबापू पाटील काय म्हणाले?
“तालुक्यात माझे हजारो कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते वेगवेगळ्या स्थरातील आहेत. शिवापूर टोलनाक्यावर एका गाडीत 5 कोटी रुपयांची रक्कम सापडल्याची बातमी मी टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळालं. ती गाडी माझी किंवा माझ्या कुटूंबातील कुणाचीही नाही,” असे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढले.
पुढे त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले. “संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि आम्ही यशस्वी राजकीय उठाव केल्यापासून रात्री झोपताना झाडं दिसतात….सकाळी उठताना डोंगर दिसतात…त्यांची नजर असते. सातत्यानं मला फक्त मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असेही शहाजीबापू पाटील म्हणाले. Shahajibapu Patil |
नेमकं काय घडलं?
MH 45 AS 2526 या क्रमांकाची 5 कोटी रुपयांची रक्कम सापडलेली ती गाडी सांगोल्यातील अमोल नलावडे याच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. तसेच ही व्यक्ती महायुती सरकारमधील बड्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वाहनातील चार जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे- सातारा महामार्गावर एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी दुपारपासून खेड-शिवापूर टोलनाक्यावर सापळा रचला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास एक संशयित वाहन टोलनाक्यावर आले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात रोख रक्कम असल्याचे आढळले.
हेही वाचा:
सपाट सुरुवातीनंतर बाजारात तेजी ; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ-आयटी क्षेत्राचा पाठिंबा





