रांजणगाव महागणपती मंदिरात गणेशोत्सवानिमित्त ट्रस्टचे काटेकोर नियोजन; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Updated On:

रांजणगाव गणपती : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वसलेले अष्टविनायकांपैकी चौथे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या रांजणगाव महागणपती मंदिरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट, स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांच्या समन्वयाने भाविकांसाठी सर्वतोपरी व्यवस्था केली आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई पुष्प सजावट करण्यात आली आहे.

सरदार किबे यांनी बांधलेल्या या ऐतिहासिक मंदिराच्या भव्य गाभारा आणि सभामंडपात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यंदाच्या गणेशोत्सवात दर्शन रांग व्यवस्थापन, पार्किंग, पोलीस सुरक्षा, पालखी मार्गाची दुरुस्ती, आणि स्वच्छतागृहांसह अन्य सुविधांचे नियोजन ट्रस्टने काटेकोरपणे केले आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

रांजणगाव महागणपती मंदिराचा हा गणेशोत्सव भाविकांसाठी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभवाचा संगम ठरणार आहे. गणेशभक्तांनी या उत्सवात सहभागी होऊन बाप्पांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन करते. भाद्रपद गणेशोत्सवाव्यतिरिक्त त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आयोजित किर्तन, दिपोत्सव, फटाक्यांचा कार्यक्रम, तसेच ग्रंथ-पाठ आणि स्तोत्र प्रवचनांचे आयोजन ट्रस्टच्या वतीने केले जाते.

आणखी संबंधित बातम्या

Cancellation of Additional Surcharge : गणेशोत्सवासाठी बसच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के अतिरिक्त अधिभार रद्द

2026-08-21 16:22:46

Cancellation of Additional Surcharge : गणेशोत्सवासाठी बसच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के अतिरिक्त अधिभार रद्द

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवातील 'डीजे'वर पुणे पोलिसांची ‘साऊंड टेस्ट’; ‘प्रेशर मिड’वर विशेष लक्ष

2026-08-20 22:07:29

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवातील 'डीजे'वर पुणे पोलिसांची ‘साऊंड टेस्ट’; ‘प्रेशर मिड’वर विशेष लक्ष

Sugar Stock Limit : साखरेचे दर विक्रमी पातळीवर! सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय, डीलर्सना बसणार झटका

2026-08-20 17:34:36

Sugar Stock Limit : साखरेचे दर विक्रमी पातळीवर! सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय, डीलर्सना बसणार झटका

Sonam Wangchuk : "सरकार आणि युवा पिढीतील विश्वास महत्त्वाचा"; सोनम वांगचूक यांचे विधान

2026-07-30 18:03:07

Sonam Wangchuk : "सरकार आणि युवा पिढीतील विश्वास महत्त्वाचा"; सोनम वांगचूक यांचे विधान

Ganesha festival: यंदा 'गणपती बाप्पा' महागणार! मूर्तींच्या किमतीत थेट २० टक्क्यांपर्यंत वाढ; काय आहे कारण?

2026-07-16 02:30:00

Ganesha festival: यंदा 'गणपती बाप्पा' महागणार! मूर्तींच्या किमतीत थेट २० टक्क्यांपर्यंत वाढ; काय आहे कारण?