Trump phone call leaked। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते. ते या त्यांच्या गुणाचा वापर करून अनेक कामे करून घेता येऊ शकतात. ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांच्यात झालेल्या संभाषणाने सध्या एकच गोंधळ उडाला आहे. या दोघांमधील फोन कॉल वरील संभाषण लीक झाल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. ब्लूमबर्गने १४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या फोन कॉलचा ट्रान्सक्रिप्ट प्रकाशित केला. हा कॉल व्हॉट्सअॅपद्वारे झाला होता आणि त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग मिळवण्यात आली होती. या संभाषणात, विटकॉफ युरी उशाकोव्ह यांना,”ट्रम्पसोबत कामे पूर्ण करण्यासाठी खुशामत करणे महत्त्वाचे आहे.असे म्हटले आहे. त्यानंतर लीक झालेल्या ट्रान्सक्रिप्टनुसार, युरी उशाकोव्हने विटकॉफला विचारले की दोन्ही नेत्यांमध्ये (ट्रम्प आणि पुतिन) टेलिफोन कॉलची व्यवस्था करता येईल का. “ट्रम्पचे उघडपणे कौतुक करा” विटकॉफने युरी उशाकोव्हला राष्ट्रपती पुतिन यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलताना उघडपणे प्रशंसा करण्यास सांगावे आणि त्यांना गाझा शांतता नायक आणि जागतिक शांततेचा नेता असे संबोधावे आणि पुतिन यांनी युक्रेन युद्ध सोडवण्यासाठी रशियाचे सूत्र ट्रम्प यांना त्वरित सांगावं असं देखील त्यांनी म्हटलं आहे. “गाझा युद्धबंदीबद्दल पुतिन यांनी ट्रम्पचे अभिनंदन ” Trump phone call leaked। या संभाषणात, विटकॉफ युरी उशाकोव्हला सांगतात की “माझा माणूस (ट्रम्प) यासाठी तयार आहे.” संभाषणादरम्यान, विटकॉफ उशाकोव्हला सुचवतात की पुतिन यांनी ट्रम्प यांना गाझा युद्धबंदीबद्दल अभिनंदन करावे, रशियाने त्यांना पाठिंबा दिला आहे असे म्हणावे आणि ट्रम्प यांना खरा शांततावादी म्हणावे.असा सल्लादेखील दिला आहे. “या कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे अभिनंदन करावे आणि म्हणावे की तुम्ही त्याला पाठिंबा दिला आहे आणि ते घडले याचा तुम्हाला आनंद आहे.” लीक झालेल्या संभाषणाचा हा भाग १४ ऑक्टोबर रोजीचा आहे आणि पुतिन-ट्रम्प बैठक १६ ऑक्टोबर रोजी झाली. लीक झालेल्या उताऱ्यावर ट्रम्प काय म्हणाले ? Trump phone call leaked। लीक झालेल्या उताऱ्यानुसार, विटकॉफ पुढे म्हणाले, “मी राष्ट्रपतींना सांगितले की रशियन फेडरेशनला नेहमीच शांतता करार हवा आहे. मला तेच वाटते. मुद्दा असा आहे की आपण दोन देश आहोत ज्यांना तडजोड करण्यास अडचण येत आहे.” विटकॉफ यांनी पुढे बोलताना, “मी असा विचार करत आहे की कदाचित आपण गाझामधील प्रस्तावासारखा २०-सूत्री शांतता प्रस्ताव मांडावा.” असे म्हटले. ट्रम्प यांना या संभाषणात कोणतीही अडचण नव्हती. त्यांनी सांगितले की ही एक स्टॅंडर्ड पद्धत आहे. रशियाने म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्या वरिष्ठ सल्लागारांमधील कॉलचे लीक झालेले रेकॉर्डिंग हे युक्रेन शांतता चर्चेला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे.