Donald Trump : ट्रम्प गब्बर, समर्थक कंगाल! क्रिप्टोतून ट्रम्प यांना 140 कोटी डॉलर्सचा नफा; 85% गुंतवणूकदार मात्र तोट्यात
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल' आणि 'मीम-कॉइन्स' या क्रिप्टो उपक्रमांतून त्यांनी गेल्या वर्षभरात तब्बल १.४ अब्ज डॉलर्सची (सुमारे १४० कोटी डॉलर्स) कमाई केल्याची धक्कादायक माहिती त्यांच्या आर्थिक विवरणपत्रातून समोर आली आहे.

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल’ आणि ‘मीम-कॉइन्स’ या क्रिप्टो उपक्रमांतून त्यांनी गेल्या वर्षभरात तब्बल १.४ अब्ज डॉलर्सची (सुमारे १४० कोटी डॉलर्स) कमाई केल्याची धक्कादायक माहिती त्यांच्या आर्थिक विवरणपत्रातून समोर आली आहे.
मात्र, ट्रम्प यांच्या ब्रँडवर आणि जगाची क्रिप्टो राजधानी बनवण्याच्या त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या हजारो समर्थकांना आणि क्रिप्टो चाहत्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे.
‘नॅन्सेन’ या क्रिप्टो डेटा संस्थेच्या आकडेवारीनुसार, ट्रम्प यांच्या मीम-कॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांपैकी दोन-तृतीयांश आणि ‘वर्ल्ड लिबर्टी’चे टोकन खरेदी करणाऱ्यांपैकी तब्बल ८५% गुंतवणूकदार सध्या मोठ्या तोट्यात आहेत. पदग्रहण समारंभाच्या काही दिवस आधी लाँच झालेल्या ट्रम्प यांच्या मीम-कॉइनचे बाजारमूल्य सुरुवातीला १५ अब्ज डॉलर्सवर होते, परंतु नंतर त्यात ९७% ची मोठी घसरण होऊन ते आता अवघ्या ४०० दशलक्ष डॉलर्सवर आले आहे.
हेही वाचा – Elon Musk : आयफोनला टक्कर? इलॉन मस्क आणणार नवा ‘एआय’ हँडसेट!
यामुळे समर्थकांसाठी हा काळ ‘क्रिप्टो विंटर’ (मंदीचा काळ) ठरला आहे. या अनपेक्षित लाभावर बोलताना ट्रम्प यांनी मात्र याचे श्रेय शेअर बाजारातील तेजीला दिले. माझ्याकडे भरपूर रोख रक्कम असल्याने मी नफा कमावत असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी बोलताना स्पष्ट केले.
हितसंबंधांचा संघर्ष –
दुसरीकडे, राष्ट्राध्यक्षपदाचा वापर करून अशा प्रकारे व्यवसाय करण्यावरून अमेरिकन सिनेटमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. डेमोक्रॅटिक आणि काही रिपब्लिकन सिनेटर्सनी आगामी क्रिप्टो नियमन विधेयकात राष्ट्राध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींना क्रिप्टोमधून नफा कमावण्यास बंदी घालणारी नैतिकतेची कठोर तरतूद समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
ट्रम्प यांच्या या वाढत्या व्यवसायामुळे ‘हितसंबंधांचा संघर्ष’ निर्माण होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर व्हाईट हाऊसने या सर्व कृती अमेरिकन जनतेच्या हितासाठीच असल्याचे सांगत आरोपांचे खंडन केले आहे.





