सच्चा शिवसैनिक! तोंडावर मास्क, चालताना थकवा तरीही…”; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर

Sanjay Raut : शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज १३ वा स्मृतीदिन असून, या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. या दिनाच्या निमित्ताने स्मृतीस्थळावर फुलांची आकर्षक आरास करण्यात आली असून, बाळासाहेबांचा फोटोही लावण्यात आला आहे.
गंभीर आजारामुळे मागाली काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले खासदार संजय राऊत यांनी स्मृतीस्थळावर येऊन दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतले. ऐरवी त्यांचा पेहराव आणि आताच्या पेहरावात काहीसा बदल जाणवत होता. स्मृतीस्थळाबाहेर गेटवरून ते आपल्या गाडीतून खाली उतरले. त्यावेळी त्यांना हाताला धरून त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी स्मृतीस्थळाच्या ठिकाणी नेले. यावेळी संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. तसेच त्यांना चालताना त्रास जाणवत होता.
ज्यांच्यामुळे मी घडलो
असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना!
असा पुरुष सिंह होणे नाही!मराठी माणसाने एकजुटीने राहावे
आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली!
साहेब,
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/j77ALrc7vv— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2025
सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास खासदार संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले. संजय राऊत हे आल्याचे समजताच शिवसैनिकांनी त्यांना अभिवादन करत त्यांच्या जिद्दीला सलाम केला. “कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला” अशा घोषणा यावेळी दिल्या. नुकतेच काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सार्वजनिक कार्यक्रमातून ब्रेक घेतला असून पुढच्या वर्षी सक्रीय होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज ते पहिल्यांदाच दिसले.
संजय राऊत यांचे ट्वीट
ज्यांच्यामुळे मी घडलो, असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना! असा पुरुष सिंह होणे नाही! असे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. मराठी माणसाने एकजुटीने राहावे आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे ट्वीट संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी केले आहे.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्रित दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर त्यांना अभिवादन केले. यावेळी इतरही राजकीय नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : मुस्लिमांनी तेजस्वी यादवपेक्षा ओवैसीवर विश्वास का ठेवला? ; काय सांगतो बिहार निवडणुकीचा पॅटर्न? वाचा





