मुंबई – टीआरपी घोटाळ्यामुळे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्ही च्या सीएफओला समन्स पाठवून शनिवारी हजर राहण्यास सांगितले आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या खात्यांचे फाॅरेन्सिक ऑडिटही केले जाणार आहे. माहितीनूसार, पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा गुन्हाही रिपब्लिक टीव्हीवर नोंदवला जाऊ शकतो. आज मुंबई पोलीसांची बीएआरसीच्या सीईओबरोबर बैठक झाली आहे. रिपब्लिक टीव्ही आणि इतर दोन्ही वाहिन्यांचा टीआरपी ट्रेंड देण्यास मुंबई पोलीसांनी बीएआरसीला सांगितले आहे. तसेच मुंबई पोलीसांनी रिपब्लिक टीव्हीच्या काही जाहिरातदारांचीही यादी तयार केली असून काही जणांना साक्षीदार म्हणून बोलवले जाऊ शकते.