Trisha Krishnan : साऊथ अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय यांच्या रिलेशनची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्रिशाचा बर्थडे आणि त्याच दिवशी तामिळनाडू निवडणुकीत विजय यांच्या पक्षाला मिळालेले मोठे यश… त्यानंतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात त्रिशाची उपस्थिती यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं. मात्र अद्यापही रिलेशनशच्या चर्चांवर दोघांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. यानंतर आता त्रिशाची पोस्ट चर्चेत आली आहे. त्रिशाने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून, ज्यात तिने विजयचा उल्लेख केला आहे. त्रिशा कृष्णन आणि सूर्या यांची प्रमुख भूमिका असलेला ‘करुप्पू’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. सिनेमाला मिळणाऱ्या प्रेमामुळे त्रिशाने आनंद व्यक्त केला असून, तिनं सोशल मीडियावर BTS फोटो शेअर केले आहेत. पण, या फोटोंपेक्षा तिच्या कॅप्शननं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पोस्ट शेअर करताना त्रिशाने म्हटलं की, “माय मॅजिकल… आणखी एक विजय, फक्त दैवी गोष्टी…” असं म्हणत शेवटी तिनं नजर लागू नये यासाठी वापरला जाणारा एव्हिल आयचा एमोजीही वापरला आहे. तसेच, या पोस्टमध्ये तिनं सूर्या आणि संपूर्ण टीमलाही टॅग केलं आहे. ‘करुप्पू’ हा तमिळ अॅक्शन-ड्रामा सिनेमा असून त्याचं दिग्दर्शन आर. जे. बालाजी यांनी केलं आहे. सिनेमातील सूर्या यांचा दमदार अंदाज आणि त्रिशा कृष्णन हिच्या अभिनयाचं प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून कौतुक होत आहे. ‘करुप्पू’च्या प्रदर्शनापूर्वी काही आर्थिक वादांमुळे सिनेमाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले होते. अखेर 15 मे रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. Trisha Krishnan हेही वाचा: Top 10 News: नीट पेपरफुटी प्रकरणी डॉ. मनोज शिरुरेला अटक, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आणि भारती सिंगचा ९ वर्षानंतर संसार मोडणार?, वाचा टॉप १० बातम्या