Triptii Dimri : संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ ( Animal ) चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता पर्यंत ‘ॲनिमल’ चित्रपटाने ( Animal ) तब्बल 200 कोटींचा टप्पा ओलांडला असून, आगामी काळात देखील कामाईच्या आकड्यात मोठी भर होणार असल्याचं बोललं जात आहे. ‘ॲनिमल’ यावर्षातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा ओपनिंग चित्रपट बनला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर ‘ॲनिमल’ची एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी ( Triptii Dimri ) रोमान्स करताना दिसत आहेत. ही क्लिप समोर आल्यानंतर तृप्ती डिमरीची ( Triptii Dimri ) सर्वत्र चर्चा होत आहे. या अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असल्याचे दिसत आहे. आज आम्ही तुम्हाला तृप्ती डिमरी नेमकी कोण? आहे याबद्दल सांगणार आहोत.
‘अॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदान्नाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली असली तरी तिच्यापेक्षा ‘तृप्ती डिमरी’बद्दलच जास्त बोलले जात आहे. सोशल मीडियावर ‘ॲनिमल’ची एक क्लिप व्हायरल होत आहे ज्यामध्ये रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी असल्याचं दिसत आहे. सीन दरम्यान दोघे किस करताना दिसत आहेत.
सिनेमातील रणबीर आणि तृप्तीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी ही मुख्य अभिनेत्री असायला हवी होती, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. तृप्ती डिमरी सिनेमातील या एका सीनमुळे चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली असून, सगळीकडे फक्त तृप्तीची चर्चा होताना दिसत आहे.
View this post on Instagram
तृप्ती डिमरीने ( Triptii Dimri ) 2017 मध्ये रिलीज झालेल्या ‘मॉम’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ती ‘मॉम’मध्ये छोट्या भूमिकेत दिसली होती. यानंतर ही अभिनेत्री सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे यांच्या ‘पोस्टर बॉईज’ चित्रपटात दिसली होती. पण दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या ‘लैला-मजनून’ या चित्रपटातून तिला ओळख मिळाली. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती.
यानंतर तृप्ती OTT वर प्रदर्शित झालेल्या बुलबुल (2020) आणि काला (2022) या दोन चित्रपटांमध्ये दिसली. दोन्ही कथा त्यांच्याभोवती फिरतात. पण मुख्य प्रवाहातील बॉलिवूड चित्रपटांच्या प्रेक्षकांमध्ये त्यांची ओळख होऊ शकली नाही. पण आता अॅनिमलने तृप्तीला एका झटक्यात प्रसिद्धी मिळवून दिली. तृप्तीच्या या दृश्याची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत असून, यामध्ये अभिनेत्री कमालीची हॉट दिसत आहे.