BREAKING : तिहेरी हत्याकांडाने मावळ हादरले ! मृत महिलेसह दोन जिवंत मुलांना नदीत ढकलले, आरोपी अटकेत

Dainik Prabhat News : तिहेरी हत्याकांडच्या घटनेने मावळ तालुका हादरला आहे. बेपत्ता असलेल्या महिलेच्या शोधादरम्यान या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे तिचा मृतदेह नदीत टाकत असताना आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन लेकरांनाही आरोपींनी नदीत ढकलले. ही घटना दिनांक ६ ते ९ जुलै २०२४ रोजी घडली. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
संपूर्ण प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन अंतर्गत विवाहित महिला बेपत्ता असल्यावरून मिसिंग प्रकरण दाखल करण्यात आलेले होते. सदरच्या चौकशीमध्ये बेपत्ता महिलेच्या प्रियकराने तिचा गर्भपात करण्याच्या निमित्ताने तिला आपल्या मित्रासोबत ठाणे येथे पाठविले होते.
सदर ठिकाणी उपचारादरम्यान नमूद महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकराच्या मित्राने सदरची डेड बॉडी आणि महिलेच्या दोन्ही मुलांना परत घेऊन येवून तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक ९ जुलै २०२४ रोजी पहाटे प्रियकराच्या मदतीने सदरची डेड बॉडी नदीमध्ये टाकून दिली.
यावेळी दोन्ही मुलांनी सदरचा प्रकार पाहून रडू लागल्यामुळे त्यांना देखील जिवंतपणे नदीमध्ये टाकून दिले. या अनुषंगाने तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून प्रियकर गजेंद्र दगडखैर व त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक करण्यात आलेली असून माननीय न्यायालयामध्ये पाठविण्यात आलेले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगांव एमआयडीसी हे करीत आहेत. ( Triple murder Case in Maval taluka woman killed during abortion two children pushed into river )




