ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये तिपटीने वाढ

लंडन – ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ व्हायला लागली आहे. शुक्रवारी जेवढे रुग्ण सापडले होते त्यापेक्षा तिपटीने अदिक म्हणजे दिवसाला 10 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे मानले जात आहे. ब्रिटनमध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या 90 हजारांच्यापुढे गेली आहे.
शनिवारी ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले 10 हजार 59 रुग्ण सापडले. शुक्रवारी 3,201 रुग्ण सापडले होते. त्यामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या ब्रिटनमधील रुग्णांची संख्या 24 हजार 968 इतकी झाली आहे. ब्रिटनमध्ये कोविड-19 मुळे दोन दिवसात आतापर्यंत 125 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यातील 111 जणांचा मृत्यू शुक्रवारी एका दिवसातच झाला आहे. तर ओमायक्रॉनमुळे 7 जाणांचा मृत्यू झाला आहे, असे ब्रिटनच्या आरोग्या सुरक्षा एजन्सीने म्हटले आहे.
आता पूर्वीच्याय सुरक्षा उपायांचा विचार करावा लागेल, असे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी म्हटले आहे. जर निर्बंध लावण्याचा विचतार केला गेला तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. त्याबरोबर आर्थिक प्रकेजचीही व्यवस्था केली जायला पाहिजे, असे लंडनचे महापौर सादिक खान यांनी म्हटले आहे.


