पिंपरी | इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलची तिरंगा रॅली

पिंपरी,(प्रतिनिधी) – इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल, चिखली व किवळे यांच्या वतीने तिरंगा रॅली काढली. रॅलीमध्ये, विद्यार्थ्यांनी उत्कटतेने घोषणा देत देशभक्तीपर वातावरण निर्मिती केली. रॅली शाळेच्या आवारात पोहोचताच, लहान विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
कार्यक्रमा दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पवार यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बसमधून प्रवास करताना किंवा रस्त्यावरून चालताना सुरक्षिततेच्या उपायांबाबत मार्गदर्शन केले.
महापालिका उपायुक्त अण्णा बोदाडे यांनी विद्यार्थ्याना पर्यावरण व पृथ्वी माता स्वच्छ व निरोगी ठेवण्याच्या त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देत शपथ घेतली.
या उत्सवाची सांगता लेझिम नृत्य आणि मधुर देशभक्तीपर गाण्यांनी झाली. महापालिका उपायुक्त अण्णा बोदाडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज पवार, निरीक्षक आशिष काळदाते, वैभव फापडे, धनराज नाईकवाले, तानाजी दाते, आरोग्य विभागाचे अधिकारी, ज्येष्ठ नागरिक भालचंद्र देशमुख, भिकाजी थोरात आणि सुधीर, चिखली व किवळे येथील दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व संचालक उपस्िथत होते.
संचालिका कमला बिष्ट आणि संचालक डी.आर. संजय सिंह, डॉ. अजित थिटे आणि प्रशांत पाटील हे देखील सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संस्थापक संचालिका कमला बिष्ट यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.





