आदिवासी प्रशिक्षण संस्थेला 50 लाखांचा निधी

पुणे – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला 50 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने मान्यता दिली.
2018-19 या आर्थिक वर्षाकरिता आदिवासी संशोधन संस्थांना सहाय्य या योजनेंतर्गत केंद्र शासनाने एकूण 4 कोटी 85 लाख रुपयांचा निधींच्या प्रस्तावांना मान्यता प्रदान केली आहे. त्यापैकी 3 कोटी 88 लाख रुपयांचा निधी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तांना पूर्वीच वितरीत केला आहे.
केंद्र शासनाकडून उर्वरित निधीचा दुसरा हप्ता वितरीत करण्यासही मान्यता मिळाली आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे उपसचिव ल. गो. ढोके यांनी आदेश काढले.
मंजूर निधी ज्या बांबीसाठी दिला आहे.
त्याचसाठी खर्च करावे. त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र व आर्थिक भौतिक अहवालासह शासनाकडे सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. डोम उभारण्यासाठी 19 लाख 53 हजार रुपये, आर्ट गॅलरीसाठी 3 लाख 8 हजार रुपये, संग्रहालय, प्रशिक्षणासाठी 16 लाख 4 हजार रुपये याप्रमाणे निधी खर्च करावा लागणार आहे.





