कृष्णा हॉस्पिटलमध्ये करोनामुक्तीचे त्रिशतक

तालुक्‍यातील 16 जणांना डिस्चार्ज; एकूण 310 रुग्ण करोनामुक्त

कराड – जिल्ह्यात एका बाजूला करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसऱ्या बाजुला कराडच्या कृष्णा हॉस्पिटलने करोनामुक्‍तीची यशस्वी वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे. करोनाग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून सोमवारी 16 रुग्ण बरे झाले असून त्यांना सोमवारी घरी सोडण्यात आले.

हॉस्पिटलमधील योग्य उपचारांमुळे आतापर्यंत तब्बल 310 रुग्ण करोनामुक्त झाले असून हॉस्पिटलने करोनामुक्तीचे त्रिशतक पूर्ण केले आहे. कराड तालुक्‍यातील तुळसण येथील 50 वर्षांचा पुरुष, तारुख येथील 40 वर्षांचा पुरुष, 35 वर्षांची महिला, जखिणवाडीतील 52 वर्षांचा पुरुष, 47 वर्षांची महिला, लटकेवाडीतील 19 वर्षांचा युवक, पाटण तालुक्‍यातील उरूल येथील 60 वर्षांचा वृद्ध, नवसरी येथील 15 व 17 वर्षे वयाची दोन मुले, 29 वर्षांची महिला, सडा दाढोलीतील 29 वर्षांची महिला, 11 व 4 वर्षे वयाच्या मुली, हलवळेवाडी-बहुले येथील 28 वर्षांचा युवक, काजरेवाडी-खळे येथील 35 वर्षांचा युवक, परभणी जिल्ह्यातील 26 वर्षांचा युवक, अशा 16 जणांना आज घरी सोडण्यात आले.

तहसीलदार अमरदीप वाकडे, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. नम्रता कदम, योगेश कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन या रुग्णांना निरोप देण्यात आला.

जिल्ह्यात एकूण 29 नागरिकांना डिस्चार्ज
जिल्ह्यात विविध रुग्णालये आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 29 नागरिकांना दहा दिवसांनंतर सोमवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये खटाव तालुक्‍यातील कातरखटाव येथील 27 वर्षांचा युवक, फडतरवाडीतील 55 वर्षांची महिला, सातारा तालुक्‍यातील प्रतापगंज पेठ (सातारा शहर) येथील 46 वर्षांचा पुरुष, जिहे येथील 42, 20, 49, 36, 25 वर्षांचे पुरुष व 25 वर्षांची महिला, या रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. त्यांना टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.