पिंपरी | तळेगावमध्ये नगरपरिषदेकडून वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील स्टेशन तळे परिसर, जुन्या मुंबई – पुणे महामार्गालगत तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे नियोजन उमुख्याधिकारी तथा उद्यान विभाग प्रमुख ममता राठोड आणि उद्यान विभाग सहाय्यक विशाल मिंड यांनी मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
या वेळी कर विभाग अधिकारी विजय शहाणे, भांडार विभाग प्रमुख सिद्धेश्वर महाजन, नगर रचना सहाय्यक वीरेंद्र नारगुंडे, आस्थापना विभाग प्रमुख मनीषा चव्हाण, स्वच्छता निरीक्षक प्रमोद फुले, तुकाराम मोरमारे, विभा वाणी आदी उपस्थित होते.
एन.के पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणे तसेच लावण्यात आलेल्या वृक्षांची जपणूक करणे किती आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. सुमारे २०० झाडांच्या रोपांची लागवड आज करण्यात आली. या उपक्रमासोबतच जुन्या मुंबई – पुणे महामार्गालगत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रमदान केले.




